• Site Admin
  • January 11, 2018
  • 0 Comment

सध्या महाराष्ट्रात दुष्काळ असल्यामुळे शेतकरी हा विषय TRP बनला आहे . गेली अनेक वर्षे ह्या विषयावर सर्व स्तरावर चर्चा होत आहे . अजुनही ह्या विषयावर पुर्णतः निसर्गावर जबाबदारी टाकुन आपण मोकळे होत आहोत . ह्या वर्षी पाऊस चांगला पडला की शेतकरी अचानक समृध्द होइल असे स्वप्न पाहुन आपण मुळ मुद्दा टाळत आहोत . शेतकऱ्यांने कितीही मेहनत घेतली आणि निसर्गाने त्याला साथ दिली तरी हे सगळ बदलेल अस आपल्याला खरच वाटत का ?

शेतकरी हा जागतीक अर्थव्यवस्थेतील असा एकमेव घटक आहे जो सर्व कच्चा माल रिटेल बाजारातुन खरेदी करतो आणि तयार माल घाऊक बाजारपेठेत जाऊन विकतो आणि दोन्ही बाजुचा ट्रान्सपोर्टचा खर्च पण तोच करतो .
ह्या उलट इतर कुठलाही व्यवसायीक कच्चा माल घाऊक बाजारपेठेतुन घेतो . हा माल त्याच्या कारखान्यापर्यंत पोहचवला जातो . तयार झालेला माल तो व्यवसायीक रिटेल बाजारात विकतो आणि ते विकत घेणारा तयार माल त्याच्या कारखान्यातुन उचलतो .

औषध बनवणाऱ्या कंपन्या रिसर्च रिस्कच्या नावाखाली १००o % नफा कमवु शकतात . मात्र निसर्गाची कुठलीच जबाबदारी न स्विकारणाऱ्या समाजात शेतकरी नफा कमवतो कि नाही ह्याची साधी तसदी घेण्याची सुध्दा कुठली पध्दत अस्तीत्वात नाही .

निवडुणकीआधी कुठल्या पक्षाला किती जागा मिळेल ह्यावर महीनों न महिने चर्चा होऊ शकते पण पाऊस किती पडेल कुठल पीक घेतल्या मुळे शेती फायदेशीर होइल ह्याची चर्चा पण होताना दिसत नाही .
सेन्सेक्स किती अंशांनी वर किंवा खाली गेला हे रोज मन लावुन ऐकणारा समाज शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाचा किती दर मिळतो ह्याचा कधी अभ्यास करताना दिसत नाही .
हे सर्व बदलल पाहीजे अस आपल्या सगळ्यांना वाटत पण कस आणि केव्हा हे समजत नाही .
ह्या सगळ्या प्रश्नांवर उत्तर शोधुन ती जीवनात कायमस्वरूपी आणण्याचा ध्यास शॉप फॉर चेंज फेअर ट्रेड हया सेवाभावी संस्थेने घेतला आहे .
वरील प्रश्नांची उत्तर शोधुन त्यावर खालील प्रमाणे कार्यप्रणाली तयार केली आहे :
१ . शेतकऱ्याला हक्काची बाजारपेठ मिळवुन देण
२ . शेतकरी ते ग्राहक अशी मार्केट लींकेज तयार करण
3. शेतक-याला त्याच्या मालाचा हमीभाव मिळवुन देण
४ . ग्राहकाला वाजवी दरात चांगलामाल मिळवुन देण

असे अनेक उपक्रम शॉप फॉर चेंज फेअर ट्रेड ने हाती घेतले आहेत .
ह्या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हाव ही विनंती .
आपण ह्या उपक्रमाला खालील प्रकारे मदत करू शकात:
१ . ह्या उपक्रमात आपाण ग्राहक बनुन शेतकऱ्याला शाश्वत बाजारपेठ दया
२ .  ह्या उपक्रमात स्वंयसेवक बनुन आपला अमुल्य वेळ देऊ शकता
3 . ह्या उपक्रमाला आर्थिक मदत करुन ही चळवळ अजुन मोठी करण्यास मदत करू शकता

image

समीर आठवले
शॉप फॉर चेंज फेअर ट्रेड
www.shopforchange.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

q2 (1)

NEWSLETTER

q1 (1)